आज आपल्या *नेमसुशिल विद्यामंदिर तळोदा* येथे *फ्रांस चा इंग्लिश शिक्षिका श्रीमती पॉलिन व्हॅन मार्ले* व *राष्ट्रीय स्तरावरील वकील व समाज सेवक ऍड श्री प्रणव शिंदे यांनी भेट दिली..*
विद्यार्थ्यांना प्रदूषण व प्लास्टिक मुक्त जीवनाचा संदेश श्रीमती पॉलिन मॅडम यांनी दिले.तर यशस्वी जीवना साठी वेळेचा सदुपयोग व ध्येय प्राप्ती साठी सकारात्मक विचारांचे महत्व ऍड प्रणव शिंदे यांनी पटवून दिले..
श्रीमती पॉलिन हे फ्रांस येथे इंग्लीश शिक्षिका होत्या,आता ते सेवानिवृत्त झाल्या आहेत.भारतीय संस्कृती आणि आध्यात्मने ते प्रभावित झाल्या असून भारतात योगाचे प्रशिक्षण घेऊन फ्रांस मध्ये ते लोकांना योग प्रशिक्षण देतात…
विशेष म्हणजे आपल्या शाळेची स्वच्छता, हिरवळ,आणि विद्यार्थ्यांची शिस्त त्यांना खुपच आवडली….
मुख्याध्यापक प्राचार्य श्री सुनिल परदेशी सरांशी शैक्षणिक हितगूज केली.तसेच भारत व फ्रांस चा शिक्षण पद्धतीत असलेला बदल जाणून घेतला..
या कार्यक्रमात नेमसुशिल विद्यामंदिर तळोदा चे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सूत्रसंचालन रवींद्र गुरव यांनी केले
